मंडळाची माहिती
निवेदन

|| वक्रतुन्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ||
|| निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ||

गणरायांच्या चरणी विनम्र अभिवादन

आदरणीय वर्गणीदार, देणगीदार, जाहीरातदार, शुभचिंतक, रहीवासी आणि बंधु भगिनींना सादर प्रणाम. भाविक भक्त जनहो आपण सर्वांच्या सोबतीने मंडळाने २९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. श्री गणरायांच्या क्रुपेने अनेक निष्ठावंत कर्यकर्ते अविटन परिश्रम करुन हा उत्सव अतिशय उत्त्तमरीत्या साजरा होण्यासठी प्रयत्नशिल असतात. आमच्या तरुण कर्यकर्त्यांची श्रीं वर असलेली नितांत श्रध्दा भक्ती आणि आस्था हीच आपल्या उत्सवाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. उत्सवाचे धार्मिक स्वरुप जोपसताना समाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवीत मंडळ सतत सक्रिय जागृत रहात असते. मारुती गल्लीतील व फोर्ट मधील सर्व गणेश भक्तांचा भक्तीभावपुर्ण सहभाग यामुळे उत्सवात मंगलमय वातावरण निर्मित होत असते. सर्व धर्म समभावातुन राष्ट्रीय एकात्मतेच प्रतिक म्हणुन गणेशोत्सव जास्त प्रमाणात साजरा केला जावा ही लोकमान्य टिळकांची इच्छा आम्ही पुर्ण करण्यास बांधिल आहोत.

आमची वेबसाईट पहाण्याबद्दल श्री मरुती गल्ली बाळ गणेश सर्वाजनिक उत्सव मंडळ (फ़ोर्टचा युवराज) आपले खुप खुप आभारी आहे.

मंडळाने आतापर्यंत केलेली समाजपयोगी कार्यक्रम:
* गुणगौरव समारंभ, विनामुल्य वह्यावाटप, स्कॉलरशिप
* भुकंपपिडीतांना मदत, बाँम्बस्पोटातील पिडीतांना मदतकार्य, वैद्यकीय मदत

मंडळाने मिळवलेले पुरस्कार:
* आदर्श गणेशोत्सव मंडळ (फ़ोर्ट विभाग) सन १९९६ प्रथम परीतोषिक

जय हिंद जय महाराष्ट्र